गंगेच्या पुराचे पाणी आता पेयजल म्हणून वापरले जाणार

    23-Nov-2022
Total Views |
 

भारतात प्रथमच बिहारमध्ये सुरु होणार प्रकल्प 


मुंबई : अध्यात्मिक पर्यटन केंद्र बोधगया, गया आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या राजगीरला पेयजल अर्थात प्रक्रिया केलेले शुद्ध  गंगाजल उपलब्ध होणार आहे. यापूर्वी  येथील भौगोलिक रचनेमुळे या भागात गंगाजलाची  उपलब्ध नव्हती. जरी गंगा  जरी या भागातून  वाहते, तरीही तीच्या मार्गावरीलच काही भागांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. या भागात वर्षभर पिण्याच्या पाण्याची  गंभीर समस्या भेडसावते. या समस्येवर मात करण्यासाठी वेगळ्या संकल्पनेवर आधारित भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. मुख्यमंत्री नितीश कुमार 27 नोव्हेंबर 2022 रोजी राजगीरमध्ये प्रकल्पाचे उद्घाटन करतील.  गया आणि बोधगयाचे येथील प्रकल्पाचे उद्घाटन 28 नोव्हेंबर 2022 रोजी आहे.


प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचे काम संपुर्ण झाले आहे. वास्तुशास्त्रीयदृष्ट्या देखील हा प्रकल्प उल्लेखनीय आहे, कारण स्थानिक पर्यावरणाची हानी  न करता  नैसर्गिक रचनेचा  वापर करून एक मोठा नैसर्गिक जलाशय तयार केला गेला. पटनाच्या मोकामा येथील हथिदा घाटातून गंगेचे पाणी उचलले जाईल आणि पाइपलाइनद्वारे या शहरांना पुरवले जाईल. MEIL ने COVID-19 आणि इतर या सारख्या आव्हानांचा सामना करत विक्रमी वेळेत ही कामे पूर्ण केली. हा प्रकल्प बिहारच्या जनतेच्या सेवेसाठी आता रुजु होत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने 132 KV/33 KV आणि 33 KV/11 KV क्षमतेची दोन वीज उपकेंद्रे उभारली आहेत, 151 किमी लांबीची पाइपलाइन टाकली आहे, चार पूल आणि एक रेल्वे ओव्हर ब्रिज बांधला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.