प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत शिवक्रांती कामगार संघटनेचा २५ वा मेळावा संपन्न

    22-Nov-2022
Total Views |

Pravin Darekar
लोणावळा :
शिवक्रांती कामगार संघटनेचा २५ वा कामगार मेळावा नुकताच लोणावळा येथे पार पडला. या कामगार मेळाव्याला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. तसेच जेव्हा जेव्हा कामगारांवर कोणतेही संकट, अडचण येईल त्यावेळेला तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही क्षणी सोबत असेन असा विश्वास उपस्थित कामगारांना दिला.

दरेकर म्हणाले की, "मी विद्यार्थी दशेपासून आक्रमकपणे लढणारा कार्यकर्ता आहे. ज्या ठिकाणी अन्याय दिसतो त्या ठिकाणी कशाचीही परवा न करता लाथ मारून कामगारांना न्याय देण्याचे काम हा माझा स्वभाव विद्यार्थी चळवळीपासून आहे. प्रेमात खूप ताकद आहे. विजय पालेकर यांचे प्रेम अत्यंत मनापासून होते. मेळाव्याला यावे आमच्या कर्मचाऱ्यांना विश्वास द्यावा, त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. आणि मग जिथे प्रामाणिकपणा दिसतोय, जिथे जो कामगार नेता प्रामाणिकपणे आपल्या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगारांसाठी काम करतोय त्यावेळेला माझाही नाईलाज झाला आणि या ठिकाणी या संघटनेचे पालकत्व घेण्याची भूमिका अत्यंत मनापासून घेतली. जेव्हा जेव्हा कामगारांवर कोणतेही संकट, अडचण येईल त्यावेळेला तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही क्षणी आपल्या सोबत असेन हा २५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास देतो."
ते पुढे म्हणाले, "द्वारकानाथ पवारांनी ज्या गिरणी कामगारांसाठी लढा उभारला त्या गिरणी कामगारांचा मेळावा आटोपून मी याठिकाणी आलो आहे. जे गिरणी कामगार, मुंबईचे वैभव, मुंबईतील गिरण्या बंद पडल्या, या गिरण्या ज्यावेळी बंद पडल्या तेव्हा गिरणी कामगारांना घरे द्यायची असा निर्णय झाला. पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री असताना अतिशय चांगला निर्णय घेतला. ते माथाडी कामगारांसाठी कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत २०० कोटी रुपये दिले. माथाडी कामगारांना सरकारने भूखंड दिला. भूखंड दिला जबाबदारी संपली. भूखंड दिल्यावर माथाडींना पैसे कोणच देत नव्हते. इमारत बांधणार कशी? कारण माथाडीकडे फक्त बॅच, ना कागद ना पगाराची पावती त्यांना कोण पैसे देणार. मी डोके चालवले माथाडीची पतपेढी होती ती आमच्या जिल्हा बँकेची सभासद होती. मी सांगितले तुमच्या पतसंस्थेला कर्ज देतो तुम्ही पतसंस्थेने तुमच्या बॅच, कागदपत्रावर इमारत बांधायला पैसे द्या. इथेपण आपण २०० कोटी रुपये दिले. माथाडीची घरे त्याठिकाणी उभी राहिली."


दरेकर म्हणाले की, "तो विषय नाही. चांगल्याला आपण चांगलेच म्हटले पाहिजे. गिरणी कामगारांसाठी घोडपदेव येथे घरेही उभी राहिली. या घरांसाठी १०- १२ लाख रुपये भरायचे होते ते भरण्यासाठी बँकाकडे गेले. परंतु मुंबईतील एकाही बँकेने त्यांना होकार दिला नाही. याचे कारण बँकेचाही दोष नाही. बँकेने सांगितले की तुमचा गिरणी कामगार तर ६० वर्षांच्या वर गेला आहे. या गिरणी कामगारला आम्ही कर्ज दिले तर परतफेड कोण करणार, परतफेडीची गॅरंटी कोण घेणार. त्यावेळी मी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटलो. त्यांना सांगितले की शासनाने निर्णय घेतलाय. परंतु गिरणी कामगार घरे घेऊ शकत नाही. कारण त्यांच्या फ्लॅटची किंमत ३०-४० लाख आहे."


"इच्छा असताना घर घेता येत नाही, कारण त्यांना कोण पैसे देत नाही. मी त्याठिकाणी शासनाला निर्णय करायला भाग पाडले की, त्यांना सहकर्जदार घ्या आणि त्याठिकाणी त्यांचा फ्लॅट भाड्याने द्यायला परवानगी द्या. अशाप्रकारे ३८५० लोकांना १०-१२ लाख रुपये दिले. १५० ते २०० कोटी रुपये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दिले. गिरणी कामगारांबाबत मला कानावर आले. माझे आजोबा गिरणीत होते.. वडील एसटी कंडक्टर होते. दिवस- रात्र एसटीमध्ये काम करत होते. त्यामुळे कामगारांच्या व्यथा मला त्याठिकाणी नीट माहीत आहेत. त्यामुळे ज्यावेळेला कामगारांचा प्रश्न येतो तेव्हा मी भावनिक होतो. एसटी कामगारांचे आंदोलन झाले त्यावेळी मी दोन दिवस त्यांच्या सोबत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी झालेलो. याचा अर्थ त्यांच्या संवेदना, व्यथा त्यांच्यातील झाल्याशिवाय कळत नाही आणि मग त्या एसटी कामगारांनाही न्याय द्यायला आपण भाग पाडले," असेही ते म्हणाले.


माथाडी कामगारांसाठी कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत २०० कोटी रुपये दिले
माथाडी कामगारांना सरकारने भूखंड दिला. भूखंड दिला जबाबदारी संपली. भूखंड दिल्यावर माथाडींना पैसे कोणच देत नव्हते. इमारत बांधणार कशी? कारण माथाडीकडे फक्त बॅच, ना कागद ना पगाराची पावती त्यांना कोण पैसे देणार. मी डोके चालवले माथाडीची पतपेढी होती ती आमच्या जिल्हा बँकेची सभासद होती. मी सांगितले तुमच्या पतसंस्थेला कर्ज देतो तुम्ही पतसंस्थेने तुमच्या बॅच, कागदपत्रावर इमारत बांधायला पैसे द्या. इथेपण आपण २०० कोटी रुपये दिले. माथाडीची घरे त्याठिकाणी उभी राहिली, असेही दरेकर म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.