अहो राऊत तुमचं सरकार एका रात्रीत कसं कोसळलं माहितीयं ना!

22 Nov 2022 16:21:31

Eknath Shinde



मुंबई :
राज्यातील फडणवीस-शिंदे सरकार कोसळणार, या आशयाचं वक्तव्यं खासदार संजय राऊतांनी केल्यानंतर आता शिंदेगटाकडून त्यांचा समाचार घेण्यात आला आहे. खासदार संजय राऊतांना त्यांच्याच भाषेत बाळासाहेबांची शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी घेतला आहे. राज्य सरकार दोन महिन्यात पडेल, असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्यावर म्हात्रेंनी ट्विट केले आहे. "अहो, तुमचे आघाडी सरकार २५ वर्षे चालेल म्हणाला होतात. एका रात्रीत ते कसे कोसळले माहीत आहे ना?", असा प्रतिहल्ला त्यांनी चढविला आहे.



Powered By Sangraha 9.0