गोवरला घाबरू नका तर योग्य उपाय करा!

21 Nov 2022 12:40:08

Govar
 
 
मुंबई : मागील मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवर या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. वाढत चालला आहे. मुंबईतील गोवर रुग्णांची संख्या ही १२६ वर पोहचली असून सोमवारी गोवरच्या संशियत रुग्णांमध्ये अधिक वाढ झाली आहे. मुंबईतील गोवर उद्रेकाची स्थिती पाहता या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.
 
 
याची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील १२ विभागांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या ही एम-पूर्व विभागातील गोवंडीत अधिक बाधित आढळले आहेत. मुंबईत गोवरमुळे एक वर्षीय बालकाचा सोमवारी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर डॉक्टारांनीदेखील गोवरकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.
 
 
लक्षणे -
ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोव्याची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात.
 
 
कारणे -
सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. हवेमध्ये वाढ झालेल्या उष्णतेमुळे हा संसर्गजन्य आजार होण्याचे शक्यता अधिक आहे. तसेच संसर्गजन्य आजारांमध्ये गोवर हा आजार प्रथम क्रमांकावर येत असून अस्वच्छतेमुळे झोपडपट्ट्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. तसेच सर्दी, खोकला झालेले असताना जर मुलं बाहेर खेळण्यास गेले आणि इतर मुलांमध्ये जाऊन ते शिंकले किंवा खोकले तर संसर्ग अधिक लवकर पसरतो, कारण या आजाराचे जंतू हे हवेत साधारण २ तास असतात, असे डॉक्टर सुभाष बेंद्रे यांजकडून सांगण्यात आले आहे.
 
 
उपाय -
ज्या मुलाला गोवर झाला असेल शक्यतो त्यास आयसोलेट करण्यात यावे. तसेच मुलांनी मास्क वापरल्यास अधिक उत्तम. तसेच कॅव्हिडच्या काळात व्हिटॅमिन सी ची जशी आपणास गरज होती तसेच आता हि बी-कॉम्प्लेक्स विथ व्हिटॅमिन सी हे सिरप घ्यावे किंवा व्हिटॅमिन सी चे ड्रॉप्स घेणे सुद्धा अधिक फायदेशीर ठरेल. तसेच गोवरवर लस देखील उपलब्ध आहे ती घेतल्याने ९९% फायदा होतो, असेही डॉक्टर बेंद्रे यांनी सुचविले आहे. तसेच गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.
 
 
अधिक -
वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0