नवी दिल्ली : भारतात क्लब फुटबॉलमध्ये फिक्सिंग केल्याचा आरोपावरुन सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. सीबीआने नुकतिच दिल्लीतील द्वारका ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनमध्ये (AIFF) जाऊन अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. फेडरेशनशी निगडीत क्लब आणि त्यांच्या गुंतवणूकी संदर्भातील माहिती मागवून घेतली आहे. भारतातील फुटबॉलची गव्हर्निंग बॉडी AIFF आहे. यात फिक्सिंग दरम्यान, सिंगापुरच्या मॅच फिक्सरचाही सामावेश आहे. भारतीय फुटबॉलचे महासंघ आणइ सचिव शाजी प्रभाकरन यांच्या मते, 'AIFF मॅच फिक्सिंग सारखी प्रकरणांना कधीही स्थान देत नाही. आम्ही सर्व क्लब्सना चौकशीत सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
फुटबॉलमध्ये फिक्सिंगचे प्रकरण रविवारी उघडकीस आले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतात क्लब फुटबॉलमध्ये झालेल्या फिक्सिंग संदर्भात सीबीआयला एका एक इंटरनेशनल फिक्सरबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या शेल कंपन्यांद्वारे माध्यमांशी निगडीत कमीत कमी पाच भारतीय फुटबॉल क्लब्सतर्फे मोठी गुंतवणूक करण्यात आली. सिंगापुरच्या ज्या फिक्सर संदर्भात बोलणी केली होती. त्यांचे नाव विल्सन राज पेरूमल असल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या तपासानुसार, विल्सनने लिंविंग 3D होल्डिंग लिमिटेडतर्फे भारतातील फुटबॉल क्लब्समध्ये गुंतवणूक केली आहे. विल्सनने १९९५मध्ये सिंगापुरच्या मॅच फिक्सिंग प्रकरणत तुरुंगवासात भोगला होता. फिनलॅण्ड आणि हंग्रीमध्येही सुनावणी केली होती.
सीबीआय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आई-लीगमध्ये सहभागी टीम्सतर्फे इंडियन एरोजवरही गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. इंडियन एरोजच्या फिक्सिंग संदर्भात अधिक तपास करत आहोत. एरोजला फुटबॉल फेडरेशन आणि ओडिशा सरकारने निधी दिले हाता. त्यात कुठल्याही प्रकारचे विदेशी खेळाडू किंवा कर्मचारी नव्हते.
मात्र, टीमशी संलग्न असलेल्या विदेशी खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या करारात सहभागी असलेल्या एजन्सी आणि स्पॉन्सर्सचाही सहभाग त्यांनी नोंदविला आहे. या संदर्भातील मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मोठ्या मॅचेसमध्येही फिक्सिंग झाल्याची नोंद आहे. ओलंपिकशी निगडीत विश्व कपात पात्र संघ, महिला विश्व कप, CONCACAF गोल्ड कप आणि अफ्रीकी कप ऑफ नेशन्स सहित अन्य मोठ्या टुर्नामेंटही रडारवर आहेत, अशी माहिती आहे.