शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती

    21-Nov-2022
Total Views |
होमियोपॅथी


माणसाच्या शरीर प्रकृतीचे अचूक निदान त्याच्या पुढील उपचारांसाठी अत्यंत उपयुक्त असे असते. शरीरप्रकृतीला अनुसरुनच मग औषधांची मात्रा व त्यांची शक्ती ठरवली जाते. याच औषधाने मग शरीर प्रकृतीमध्ये आलेल्या आजाराचा चांगल्याप्रकारे उपचार होमियोपॅथीमध्ये केला जातो.होमियोपॅथीमध्ये रुग्णांचा स्वभाव हा त्याच्या संवेदनशीलतेवरुन त्याच्या मूळ गुणधर्मावरुन ‘मायाझम’च्या अभ्यासाने रोगप्रवणस्थितीचा अभ्यास करुन, तसेच अनुवांशिक गुणांवरुनही अभ्यासला जातो.


डॉ. एडवर्ड या जर्मन होमियोपॅथीक चिकित्सकाने या शरीरप्रकृतीला 3 प्रकारांत विभागले.


1) Carbo Nitrogenoid constitution

2) Oxygenoid Constitution

3) Hydrogenoid Constitution

डॉ. एडवर्ड यांनी केलेल्या या वर्गीकरणाला जगातील बहुतेक चिकित्सकांची मान्यता मिळाली. त्यांनी हे वर्गीकरण शरीरातील क्षार व रसायने यांच्या संतुलनावर आधारित असे केले. This classification is based on different biochemical content of the body.डॉ. जे. एच. क्लार्कला या सुप्रसिद्ध होमियोपॅथिक तज्ज्ञांनी त्यांच्या ‘कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज’ या पुस्तकात डॉ. एडवर्ड यांचे हे वर्गीकरण समजावून सांगितले आहे.होमियोपॅथी तज्ज्ञसुद्धा या वर्गीकरणाच्या आधारे होमियोपॅथीची औषधे शोधून रूग्णांना देऊ शकतात. त्याचा रूग्णांना खूप फायदा होतो.डॉ. एडवर्ड यांनी या वर्गीकरणासाठी शरीरासाठी क्षार व रसायनांचा अभ्यास केला. ज्याप्रमाणे आपण जाणतो की, माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले असते. अग्नी, जल, वायू, पृथ्वी व आकाश या पंचतत्त्वांचे घटक कुठल्या ना कुठल्या स्वरूपात शरीरात अस्तित्त्वात असतात.


 पृथ्वीवर मिळणारे विविध प्रकारचे क्षार व विविध प्रकारचे वायू हे माणसाच्या शरीराचासुद्धा एक घटक आहेत. हे माणसाच्या शरीराचासुद्धा एक घटक आहेत. क्षारांचे व वायूंचे व खनिजांचे जे गुणधर्म आपण पृथ्वीवर अनुभवतो त्याचप्रकारचे गुणधर्म हे शरीरातील अंतर्गत वातावरणातही कार्यरत असतात. उदा. सोडियम हा क्षार त्वरित बाष्प शोषून घेणारा क्षार आहे. त्याचा हाच गुणधर्म शरीरातील अंतर्गंत वातावरणातही पाहायला मिळतो. सोडियम या क्षारांचा असंतुलनामुळे पेशीमध्ये पाणी शोषले जाऊन पेशींना व पर्यायाने ऊती आणि अवयवांना सूज येते. म्हणूनच या क्षारांचा अभ्यास होमियोपॅथीमध्ये प्रकर्षाने केला जातो. एडवर्ड यांनी ही हेच तत्त्व अभ्यासले व त्यांच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक जीवंत प्राणी ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन आणि हायड्रोजन या घटकांनी बनलेला असतो. या क्षार व वायूच्या संतुलनात कमी-अधिक प्रमाणात जर काही बिघाड झाला, तर वेगवेगळ्या शरीर प्रकृतीची लक्षणे दिसू लागतात. याच प्रकारच्या लक्षणांचा अभ्यास आता आपण पुढे करणार आहोत. (क्रमश:)


-डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.