मंगळुरू स्फोटामागे दहशतवाद्यांचा कट!

21 Nov 2022 15:28:41
mangaluru

मंगळुरू:कर्नाटक पोलिसांनी मंगळुरूमध्ये ऑटोरिक्षात झालेला स्फोट हा सुनियोजित कट असून ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांनी या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, “हा स्फोट अचानक घडलेला नाही. राज्याचे नुकसान करण्याच्या उद्देशाने ही घटना घडवण्यात आली. प्रत्यक्षात शनिवारी मंगळुरूमध्ये चालत्या ऑटोरिक्षात अचानक स्फोट त्यानंतर आग लागली. यामुळे ऑटोमध्ये बसलेला चालक आणि एक व्यक्ती गंभीर भाजले.
 पोलिसांनी या घटनेशी संबंधित एक ‘सीसीटीव्ही फुटेज’ही जारी केले आहे, ज्यामध्ये स्फोटानंतर ऑटोरिक्षा पेटताना दिसत आहे.” डीजीपींनी ट्विट केले की, “आता पुष्टी झाली आहे की हा स्फोट अचानक घडलेला नसून, गंभीर हानी करण्याच्या उद्देशाने केलेले दहशतवादी कृत्य आहे.” ते म्हणाले की, “कर्नाटक पोलीस केंद्रीय यंत्रणांसह स्फोटाचा कसून तपास करत आहेत.” यापूर्वी मंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी सांगितले होते की, “शनिवारी सायंकाळी 5 वाजता कंकनडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऑटोरिक्षाला अचानक आग लागली. आगीचे कारण ऑटोमध्ये एका प्रवाशाची बॅग होती. या घटनेत ऑटो चालक आणि प्रवासी दोघेही भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”
 
Powered By Sangraha 9.0