श्रद्धा वाळकर हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालणार! सोमय्यांनी घेतली श्रद्धाच्या वडिलांची भेट

    21-Nov-2022
Total Views |
 मुंबई : श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. श्रद्धाच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्यांनी सोमवारी वसईतील श्रद्धाच्या घरी जाऊन भेट दिली. श्रद्धाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सोमय्यांनी त्वरीत दिल्ली पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून दिला. तसेच लवकरात लवकर श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दोघांनीही दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.