अँपलचे उत्पादन थांबले! या शहरात पुन्हा टाळेबंदी

02 Nov 2022 18:41:15
 
apple
 
 
 
नवी दिल्ली : चीनच्या शून्य कोविड धोरणाचा अँपल कंपनीला जोरात फटका बसणार आहे. जगातील सर्वात मोठे अँपल फोन निर्मितीचा कारखाना असलेल्या झेंगझाऊ शहरात कडक टाळेबंदी सुरु झाली आहे. या टाळेबंदीमुळे याआधीच या कारखान्यातून १ लाख कर्मचारी पळून गेले आहेत. त्यामुळे हा कारखाना आणि येथील उत्पादन डोही चांगलेच संकटात सापडले आहेत. चीनमध्ये ठीकठिकाणी सध्या पुन्हा कडक टाळेबंदी सुरु करण्यात आली आहे. चीनने आपले शून्य कोविड धोरण कडकपणे राबवण्याच्या निर्णयाने जय ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तिथे थेट टाळेबंदीच लागू करण्याचा निर्णय चीनमधील सरकारने घेतला आहे त्याअंतर्गत झेंगझाऊ शहरात टाळेबंदी लावण्यात आली आहे.
 
 
 
 
 
 
 
ही टाळेबंदी अजून किमान आठवडाभर म्हणजे ९ नोव्हेंबर पर्यंत सुरूच राहणार आहे. त्यानंतरही जर कोरोना रुग्ण कमी झाले नाहीत तर ही टाळेबंदी सुरूच राहणार आहे. या टाळेबंदीमुळे जीवाच्या भीतीने अनेक कामगारांनी चक्क कारखान्याच्या भिंतींवरून उद्या मारून पळ काढला आहे. त्याचे व्हिडिओज देखील वायरल झाले आहेत. त्यामुळे शहरात आणि कामगारांत प्रचंड भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटना समजताच अँपलची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीने तातडीने याबाबत स्पष्टीकरण देत कामगारांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी आणि कारखान्यातील उत्पादन सुरूच राहावे यासाठी पूर्ण नियोजन कंपनीने केले आहे.
 
या घटनेबद्दल अनेक अफवाही पसरत आहेत. एका बातमीनुसार कंपनीतून १०लाख कर्मचारी पळून गेल्याची माहिती आहे. चीन मध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी चीन सरकारने स्वीकारलेल्या शून्य कोविड धोरणामुळे कित्येक शहरे पुन्हा एकदा टाळेबंदीत गेली आहेत. संपूर्ण जनतेत या बद्दल असंतोष वाढतो आहे त्यामुळे भविष्यात याचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0