शेतकरीच हवा - मराठी मालिका मांडणार शेतकऱ्याची व्यथा

19 Nov 2022 17:19:20

malika
 
मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्रभर गाजत आहेत, अशातच मराठी मालिकेतून शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शेतकरीच नवरा हवा' ह्या मालिकेतून शेतकरी जीवनावर आधारित कथानक दाखवण्यात आलेले आहे. ही मालिका कलर्स मराठी या चॅनेलवर प्रदर्शित होत आहे.
 
 
अभिनेता प्रदीप घुले या मालिकेत सयाजीची भूमिका करत आहे. तर मुख्य भूमिकेत अभिनेत्री ऋचा गायकवाड रेवाची भूमिका करत आहे. हे दोघेही कलाकार शेतीशी परिचित असल्यामुळे त्यांना या क्षेत्राचा चांगलाच अनुभव आहे. ऋचा मूळची कोकणातली असल्याने तिच्या घरी शेती केली जाते व प्रदीप साताऱ्यातील असल्याने त्यांच्याही गावाकडे शेती असते. कोरोना काळात काही महिने तो घरी असताना शेतीची कामे त्याने जवळून पहिली आहेत असे तो माध्यमांशी बोलताना सांगतो.
 
 
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुखसोयींविषयी आपण त्यांनाच जागरूक करायला हवं असं अभिनेत्री यावेळी म्हणाली. पुढे ती म्हणाली, हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही तर त्यांच्या पत्नी व मुलांचाही आहे. त्यांच्या भवितव्याचा आहे. त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळाले तर त्यांचे आयुष्य समृद्ध होऊ शकते. शेतकरी आपला अन्नदाता आहे, तो सुखी राहिला तर आपण सुखी होऊ शकतो.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0