...म्हणून अमोल कोल्हे आणि अमित शाहंची भेट ठरतेय चर्चेचा विषय!

19 Nov 2022 02:00:54
 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी (दि. १८ नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो स्वतः अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'शिवप्रताप गरुडझेप' या त्यांचा आगामी चित्रपटाबाबत ही भेट झाल्याने कोल्हे यांनी सांगितले. तसेच दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती दरम्यान त्यांनी केली. 

यावेळी चित्रपटाव्यतिरिक्त शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वे, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडिसिटी संदर्भातही सकारात्मक चर्चा झाल्याचे कोल्हेंनी स्पष्ट केले. मात्र यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बडा नेता फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसेच रोहित पवार यांनीसुद्धा राष्ट्रवादी आणि पवार घराण्यात फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत काही राजकीय चर्चाही झाल्या का? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे. 


Powered By Sangraha 9.0