‘सीटबेल्ट’ वापराचा नियम पाळणे अनिवार्यच!

18 Nov 2022 14:49:02
seatbelt


मुंबई
:मुंबई वाहतूक पोलिसांकडून दि. 1 नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनांसाठी ‘सीटबेल्ट’चा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र, यापूर्वीही असे अनेक नियम नागरिकांसाठी लागू करूनही त्यांची अंमलबजावणी काही झाली नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे दोन हेल्मेटचा नियम. दुचाकीवरील मागील व्यक्तीनेदेखील हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र या नियमाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.

चारचाकीमधील मागील प्रवाशांकारिता ‘सीटबेल्ट’ लावणे अनिवार्य असून हा नियम दि. 1 नोव्हेंबरपासून जरी सुरू झाला आहे. मात्र, मागील वर्षभरात ‘सीटबेल्ट’चा वापर न केल्यामुळे अंदाजे दोन लाखांची दंडवसुली वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.

टॅक्सी चालकांना ‘सीटबेल्ट’ अनिवार्य


‘सीटबेल्ट’चा वापर न केल्यास 200 रुपये एका व्यक्तीस दंड असून आताच्या ‘सीटबेल्ट’ नियमाचे पालन टॅक्सी चालकांनी करणेही अनिवार्य आहे. टॅक्सी चालकांनी आपल्या टॅक्सीमध्ये ‘सीटबेल्ट’ लावून घ्यावे, याकरिता दि. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ‘सीटबेल्ट’ वापरण्यामागील गांभीर्य नागरिकांनी समजून घ्यावे आणि ‘सीटबेल्ट’चा वापर जास्तीत जास्त करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.





Powered By Sangraha 9.0