चिन्ह शरद पवारांमुळे गेलं? किशोरी पेडणेकर म्हणतात...

09 Oct 2022 20:15:12


हे सुध्दा वाचा : 

उद्धव ठाकरेंनी केली पक्ष आणि चिन्हाच्या नव्या नावाची घोषणा!
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव गोठविल्यानंतर आता नव्या नावाची घोषणा केली आहे. "त्रिशूळ, उगविता सुर्य आणि धगधगती मशाल!", असे पर्याय ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी चिन्ह म्हणून पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच पक्ष म्हणून फक्त शिवसेना हे नाव आता कुठल्याही गटाला लावता येणार नाही. त्यामुळे ठाकरे गटातर्फे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अशी नावे देण्यात आले आहेत.
 
 
उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाईव्ह करत राज्यभरातील शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी एकनाथ शिंदेंसह सर्वच ४० आमदारांवर त्यांनी टीका केली. आज शिवसेना चिन्ह गोठविल्यानंतर त्या खोकासूरांना असुरी आनंदच झाला असेल. तसेच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शक्तींनाही करुन दाखविलं, अशा भावना जागृत झाल्या असतील. असेही ते म्हणाले. अनेक संकटं आली पण शिवसैनिक लढत राहिला. ४० खोक्यांच्या रावणानं प्रभू श्री रामांचं शिवधनुष्य गोठविलं, अशी टीकाही त्यांनी केलं.
 
आज कोजागिरीची रात्र आहे. त्यानिमित्ताने सांगतो. ही रात्र वैऱ्याची आहे. अजिबात झोपू नका. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे! शिवसेना हा वटवृक्ष आहे. त्याने अनेकांना खुप दिलं. त्यापैकी काही लोकांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवली. त्यांना आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतील!', असा घणाघातही त्यांनी केला.
 
Powered By Sangraha 9.0