ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा प्रारंभ ठाण्यातुन!

08 Oct 2022 15:39:03
 
Mahaprabodhan Yatra Thane
 
 
 
 
ठाणे: शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा जाहीर मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे ऐवजी ठाकरे गटातील नेते - उपनेते उपस्थित राहणार असुन हा मेळावा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यासह नागरीकांसाठीही असणार आहे.अशी माहिती प्रवक्ते चिंतामणी कारखानिस यांनी दिली.
 
 
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून होत आहे. यासंदर्भात बोलताना कारखानिस यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना अतुट नात्याला गद्दारीचा शिक्का लागला असून स्वतःच्या राजकीय हवासापोटी शिवसेनेची गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेच्या तोफा ठाण्यात येत असल्याचे सांगितले.
 
 
 
या जाहीर मेळाव्यासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव , शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांचा प्रमुख मार्गदर्शन शिवसैनिकांना मिळणार आहे. या मेळाव्याला धर्मराज्य पक्षाचे राजन राजे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे कारखानीस यांनी सांगितले. तसेच सदर मेळावा हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठीच नाही तर सर्व सामान्य नागरिकांसाठीही असणार आहे. तेव्हा या मेळाव्यासाठी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेने ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0