कुर्ल्यात इमारतीला भीषण आग!

08 Oct 2022 18:02:22

Kurla Building Fire
 
मुंबई: कुर्ल्यातील नवीन टीळक नगर परिसरात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या इमारतीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाकडून बचतकार्य सुरु करण्यात आले आहे. दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. १३ मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
 
 
दोन जण इमारतीच्या कठड्यावर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर इतर नागरिक दोरीचा आधार घेत बाहेर पडत आहेत. धुराचे मोठे लोट आकाशात जाताना दिसत होते. दरम्यान, काही स्थानिकांनी आगीत अडलेल्या एका महिलेला वाचवण्यात यश मिळवलं. ज्या घरात आग लागली त्याच घरातील ही महिला असल्याचं सांगितलं जात आहे. तिला खिडकीच्या सहाय्याने दोन तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालवून वाचवले.
 
 
 
Kurla Building Fire
 
 
 
Powered By Sangraha 9.0