टिळकनगरमध्ये अग्नीथरार !

08 Oct 2022 21:10:48

Tilak Nagar Fire inci
मुंबई : मुंबईच्या टिळकनगरमध्ये अग्नीथरार पाहायला मिळाला. उपनगरात पुन्हा एकदा आगीचा थरार अनुभवायला मिळाला आहे. शनिवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी टिळकनगरमधील एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा शहरातील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या या आगीत ३४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने एकही मृत्यूची नोंद या दुर्घटनेत झालेली नाही. इमारतीच्या भागातील खुली इलेक्ट्रिक वायरिंग आणि अनावश्यक बाबींमुळे ही आग लागल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
 
 
मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, टिळकनगर रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या रेल्वे व्ह्यू इमारतीला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी आग लागल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूण १२ माळ्यांच्या या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली होती. लेव्हल २ ची आग असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या मदतकार्यात एकूण ३३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून यात ६ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0