मुंबई : आदिपुरुष चित्रपटाची मोठ्या उत्साहात दोन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर जनतेने चित्रपटाला कडाडून विरोध दर्शवला होता. १२ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. चित्रपटाला होणार एकंदर विरोध पाहून हा चित्रपट संक्रांतीच्या दिवशी प्रदर्शित न होता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेल्याचे सूत्रांकडून समजते.
५०० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनवला होता परंतु त्यातील काही पात्रांच्या रूपावर समाज माध्यमातून अनेक विनोद झाले तसेच मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली होती. आदिपुरुषची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेल्यानंतर नव्या तारखेची घोषणा अजून झालेली नाही. नव्या तारखेसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.