फेसबुकची मालक कंपनी 'मेटा' तिसऱ्या तिमाहीत नुकसानीत!

27 Oct 2022 18:44:35
meta
 
 
नवी दिल्ली : फेसबुकची मालक कंपनी मेटा कंपनीला दुसऱ्या तिमाहीत मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. मेटाच्या महसुलात तब्बल २ अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत महसुलात तब्बल ४ टक्क्यांची घट झाली आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कंपनी महत्वपूर्ण बदल करत आहे असे कंपनीकडून जाहीर केल्या गेलेल्या निवेदनात म्हटले आहे. मेटाच्या एकूण महसुलात जोरदार घसरण होत असल्याने कंपनीकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ही घसरण प्रामुख्याने जाहिरातींमधून येणाऱ्या महसुलात घट झाल्यामुळेच झाली आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.
 
 
 
 
 
 
या सर्व घसरणीच्या पार्श्वभूमीवर मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एक निवेदन प्रस्तुत करुन याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "सध्या मेटाच्या उत्पन्नात सातत्याने घट जरी होत असली तरी येणारा काळ हा कंपनीसाठी चांगलाच असेल आपले सर्व लक्ष २०२३कडे लागले आहे. त्यासाठी आपले नियोजनही सुरु आहे." असे आपल्या निवेदनात झुकेरबर्गने स्पष्ट केले आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये मेटा कंपनीला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता येणाऱ्या काळात कंपनी यासाठी कशी धोरणे आखते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0