राज्य परिवहन मंडळाची ३०२ वी बैठक; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता!

27 Oct 2022 16:19:25
st bus


मुंबई
: एसटी राज्य परिवहन संचालक मंडळाची ३०२ वी बैठक आज २७ ऑक्टो. रोजी होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. दर तीन महिन्याला ही बैठक नियमितपणे पार पडत असते. मात्र राज्यातील सत्तांतरामुळे चार महिन्याने ही बैठक पार पडणार आहे.


नव्याने दाखल होणाऱ्या चार हजार गाड्या ज्यामध्ये सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल गाड्या महामंळाच्या ताफ्यात दाखल होतील. तर दोन हजार इलेक्ट्रिक गाड्या भाडे तत्त्वावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या ताफ्यातील ज्या गाड्या आहेत त्या सध्या वाईट परिस्थितीत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आणि गाड्या कमी अशी अवस्था सध्या महामंडळाची आहे. त्यामुळे हा निर्णय महत्वाचा असणार आहे.


त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच उत्पन्न वाढीसाठी इतर विविध स्रोतांचा अवलंब महामंडळ करणार आहे.


 
Powered By Sangraha 9.0