5 वर्षांनंतर माथेरानमध्ये धावली ‘टॉय ट्रेन’

24 Oct 2022 16:34:39

toy train
 
 
पुणे : थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणारी ‘टॉय ट्रेन’ (छोटी रेल्वे) पुन्हा सुरु करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली ही रेल्वे सुरू झाल्यामुळे पर्यटनास मोठी चालना मिळणार आहे. स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. अपघाताचे कारण देत ही रेल्वे बंद होती.
 
 
माथेरानचा ’युनेस्को’च्या यादीत समावेश आहे. येथे ‘टॉय ट्रेन’च्या माध्यमातून पर्यटक ये-जा करतात. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे 21 किलोमीटरचे अंतर सुमारे 2 तास 20 मिनिटांमध्ये पार करते.अपघाताचे कारण देत पाच वर्षांपूर्वी ही ’टॉय ट्रेन’ रेल्वे विभागाने बंद केली होती. त्यामुळे माथेरानला येणार्‍या पर्यटकांचा हिरमोड होत होता.
 
 
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ती सुरु करण्याबाबत पुन्हा मागणी होऊ लागली होती. मोठ्या प्रमाणात निधी मिळवून रेल्वे ट्रॅक दुरुस्त करुन घेतलाही होता. अतिपावसामुळे रुळावरुन ट्रेन धावण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याठिकाणी ‘केबिन वॉल’ उभ्या केल्या. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे विभागाच्या मदतीने ‘टॉय ट्रेन’चा मार्ग दुरुस्त केला. रेल्वे विभागाने नवीन इंजीन, डब्बे देण्यात आल्याचे खा. श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0