पुणे : आंबट गोड़ फेम केतकी चितळे मूळची पुणे येथील रहिवासी आहे. मराठी मालिकांमध्ये काम करताना केतकी आपल्या संस्कृतीबद्दल सतत जागरूक असते. नुकतंच समाज माध्यमांवरून केलेलं तीच हिंदू संस्कृती विषयीचं वक्तव्य व्हायरल होत आहे.
केतकी चितळे म्हणते, "प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका. आपण जेव्हा हॅप्पी लिहितो तेव्हा शुभेच्छा आणि हॅप्पी या दोन्ही शब्दांमध्ये खूप अंतर आहे हे समजून घेण्याची गरज आहे. असे काही करुन आपण आपल्या धर्मामध्ये अंतर निर्माण करु नये."
हिंदू संस्कृतीत सण आणि उत्सवाच्या शुभेछया देताना आपण हॅप्पी दिवाळी न म्हणता शुभ दीपावली असे म्हणायला हवे असे केतकीचे म्हणणे आहे.