घाटकोपर भाजपतर्फे आनंदाचा शिधा उपक्रमाची सुरुवात

22 Oct 2022 20:39:57

Parag Shah 22.10.2022 
आनंदाचा शिधा उपक्रम
 
 
मुंबई : दीपावलीच्या औचित्यावर मुंबई भाजपकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा उपक्रमाचीही अंमलबजावणी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. शनिवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात स्थानिक भाजप आमदार पराग शाह यांच्या हस्ते मतदारसंघातील लाभार्थ्यांना शिधासंचाचे वाटप करण्यात आले.
 
 
महाराष्ट्र सरकारच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा उपक्रम राबविला आहे. शंभर रुपयात एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि पाम तेलाची पिशवी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत असून राज्यभरात मोठ्या प्रमाणात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात झालेली असून आमदार पराग शाह यांच्या हस्ते लाभार्थ्यांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील विद्याविहार पूर्व येथील शिधा वाटप केंद्रातून वाटप करण्यात आले.
 
 
या कार्यक्रमाप्रसंगी रवी पूज, विकास कामत, अजय बागल, जय देसाई, राजू बर्गे, अविनाश जाधव, रत्नम देवेंद्र, विद्युत काजी, सुशील गुप्ता, उमेश वर्मा, गणेश चाळके, जयंती भानुषाली, विलेश शाह, सहाय्यक नियंत्रक अधिकारी रामकृष्ण कांबळे, शिधावाटप अधिकारी चैतन्य वानखेडे, सहाय्यक शिधावाटप अधिकारी कैलास कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी तसेच भाजप मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0