...तर योग्य नियोजन होईल

21 Oct 2022 15:36:55
 
shekhar singh
 
 
पुणे : प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या नागरी सुविधा नागरिकांना नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि या ‘डिजिटल’ प्लॅटफॉर्मचा नागरिकांकडून जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती (डेटा) उपलब्ध करून शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी साहाय्य करण्यासाठी ‘द अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क 2022’ या उपक्रमाद्वारे प्रगतीची योग्य पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
 
 
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे भारतातील शहरांमधील ऑनलाईन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी ‘सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण’ करण्यात येत आहे. ‘नॅशनल अर्बन डिजिटल मिशन’ हे ‘शेअर्ड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर’ विकसित करीत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन नागरी सेवांची उपलब्धता, निवड आणि वापर या संदर्भात संपूर्ण देशभरातील नागरिकांचा दृष्टिकोन समजून घेणे, हा या सर्वेक्षणाचा हेतू आहे.
 
 
विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर डेटा उपलब्ध करून शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगती साधण्याच्या प्रक्रियेस सुलभ करणे हा या योजनेचा हेतू आहे. ‘नॅशनल अर्बन डिजिटल मिशन’ एक सामायिक ‘डिजिटल’ पायाभूत सुविधा तयार करीत आहे. ‘अर्बन फ्रेमवर्क आऊटकम्स’ अनुषंगाने महापालिकेच्यावतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत.
Powered By Sangraha 9.0