जाणून घ्या भाऊबीज आणि यमद्वितीया एकाच दिवशी का येते

21 Oct 2022 19:28:12

BHAUBIJ 
 
भाउबीज म्हणजे बहिण भावाच्या नात्यांचे सोहऴे. जन्मापासूनच प्रेमऴ धाग्यात गुंफलेलं हे पवित्र नातं. एकमेकांची काऴजी घेत नेहमी एकत्र वाढलेले बहिण भाऊ लग्नानंतर मात्र एकमेकांपासून विलग होतात. बहीण माहेरपणाला का होईना २ दिवस माहेरी येऊन राहून जाते, परंतु बहिणीच्या घरी तिची खुशाली घेण्यासाठी म्हणून, तिच्या घरची परिस्थिती समजून घ्यायच्या उद्देशाने म्हणा भाऊ वर्षातून दिवाळीच्या सणाला एक दिवस बहिणीच्या घरी पाहुणचाराला जातो. बहीण औक्षण करून भावाला मिठाई खाऊ घालते. बहिणींसोबतचा हक्काचा दिवस आनंदात घालवून भाऊ घरी येतो तेव्हा दोघांच्याही बालपणीच्या क्षणांना, आठवणींना उजाळा मिळालेला असतो.
 
 
भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया. दिवाळीतील शेवटचा सण. या दिवशी यमुनेने यमदेवाला भाऊ म्हणून आपल्या जवळ बोलावून त्याची पूजा करून जेऊ घातले. म्हणूनच या सणाला यमद्वितीया असं म्हंटलं जातं. भाऊ बहिणीने एकमेकांप्रती व्यक्त केलेले प्रेम पाहून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. भाऊबीजेला यमदेवाने प्रेमाची खूण म्हणून एक वर दिला. आजच्या दिवशी जो व्यक्ती यमुनेच्या पात्रात स्नान करेल त्याला स्वर्गप्राप्तीसाठी यमलोकात यावे लागणार नाही. यमुनेच्या शुद्ध पाण्याने सर्व पापांचे प्रक्षालन होईल.
 
 
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ भेट देतो तसेच गोडाधोडाचे भोजन करतो. बहिनीचा पाहुणचार घेतल्यानंतर संध्यासमयी चंद्रोदयानंतर चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला औक्षण करते. भाऊ मग औक्षणाच्या ताम्हणात 'ओवाळणी' घालून बहिणीचा निरोप घेतो.
भाऊबीज तुमच्या कुटुंबात कशी साजरी केली जाते? तुम्ही भाऊ बहीण एकमेकांना कशा प्रकारची ओवाळणी घालता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Powered By Sangraha 9.0