वरळीतील शिवसैनिकांचा कौल शिंदे गटाला

02 Oct 2022 21:51:33
eknath shinde
 
 
मुंबई : वरळीतील मच्छीमार बांधवांनी आपला कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. जोगेश्वरी, वरळी, अंधेरी, येथील विविध भागांतून पाच हजार शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हा पाठिंबा दिला आहे. कोळी बांधवांच्या या पाठिंब्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही जबरदस्त हादरा दिला, मुंबईतील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
 
 
 
 
वरळी विभागातील सर्वोदय नाखवा कोळी सहकारी संस्थेचे सदस्य, कोळी नाखवा संघाचे सदस्य, जिजामाता नगरचे रहिवासी अंधेरी विभागातील संभाजी नगर, कुलाबा विभागातील मांडवी कोळीवाडा, चिरा_बाजार येथील एस के पाटील गार्डन परिसरातील रहिवासी, भुलेश्वर, काळबादेवी आणि अंधेरीतील श्रमिक संघर्ष सेनेचे पदाधिकारी, वर्सोवा, सातबंगला, वांद्रे शासकीय वसाहत, विक्रोळी कन्नमवार नगर, गोरेगाव, दिंडोशी येथील नागरिकांचा समावेश होता. शिंदे गटाकडूनही पक्ष विस्ताराचे काम सुरु आहे त्याला आता यश मिळत आहे.
 
 
 
 
 
याच प्रसंगी मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना एक वेतन दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्य सेविका भगिनी तसेच राष्ट्रीय शिक्षक कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी देखील दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भेट घेऊन आभार व्यक्त केले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0