कोकण पर्यटन विकास परिषदेचे मुंबईत उदघाटन

19 Oct 2022 13:15:42

Kokan Councisl - Pravin Darekar
 
 
प्रवीण दरेकर
 
 
 
मुंबई : कोकण पर्यटन विकास परिषदेचे मुंबईत उदघाटन करण्यात आले आहे. नुकतेच दादरच्या सावरकर सभागृहात कोकण पर्यटन विकास परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोकण पर्यटन उद्योगासमोरील अडचणी, पर्यटनपूरक धोरणे, कोकणाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, सहजपणे परवानग्या आणि नियमावली आवश्यकता इत्यादी बाबींवर दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा झाली.
 
 
पर्यटनाला दिशा देणारा कार्यक्रम
 
पर्यटन विकास परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, 'कोकणातील काही पर्यावरणप्रेमी स्थानिक तरुणांनी विकसित केलेल्या इको टुरिझम प्रकल्प, साहसी पर्यटन, वॉटर फॉल टुरिझम अशा विविध उपक्रमांतून कोकणात १०० कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभी केली आहे. कोकणासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांसाठी आणि त्यातून झालेल्या आर्थिक बदलांसाठी मी संबंधित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आज आयोजित करण्यात आलेली कोकण पर्यटन विकास परिषद बैठक कोकणच्या पर्यटनाला नवीन दिशा देणारी ठरेल यात शंका नाही.,' असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0