मुंबई ( Chhatrapati Shivaji Maharaj ): भाजपचे आक्रमक नेते नितेश राणे यांनी "महाराजांपेक्षा मोठे कोण?", असा प्रश्न विचारून सोशल मिडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावरून एक वादग्रस्त पोस्टर प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा छायाचित्र आहे. त्यामुळे या पोस्टरवर आक्षेप घेत, राणेंनी विरोध दर्शवला आहे.
रोहित पवारांचे ट्वीट आणि वादग्रस्त पोस्टर
"आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही सलग तिसऱ्या वर्षी 'सृजन'च्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय 'दुर्गराज गड-किल्ले बांधणी महास्पर्धा' लवकरच घेत आहोत...", अश्या मथळ्या खाली आ.रोहित पवार यांनी वादग्रस्त पोस्टर ट्वीट केले. परंतु भाजपचे फायरब्रांड नेते नितेश राणे यांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj )आक्षेप घेतल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता वाढली आहे.
महत्वाच्या व्यक्तींंचा अथवा महापुरुषांचा फोटो हा नेहमीच दर्शनी किंवा सगळ्यात वर लावण्याचा एक संकेत आहे. त्यामुळे नितेश राणे यांचे संतापणे साहजिक आहे. काही कार्यकर्ते खासगीत शरद पवारांचा उल्लेख जाणता राजा असा करतात. मात्र, महाराष्ट्र आणि देशाचा 'जाणता राजा' ( Chhatrapati Shivaji Maharaj ) हे केवळ एकमेव आहेत. पवार हे ज्येष्ठ आणि मोठे नेते असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना करणे योग्य नाही. त्यामुळे पवारांचे लांंगून चालन करण्याच्या नादात आपण छत्रपतींचा अपमान करतोय का? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
दिवाळीमध्ये महाराजांचे गड किल्ले बनवून,महाराजांचा इतिहास जागवण्याचा प्रघात आहे. बरेचसे सामाजिक कार्यकर्ते व पुढारी गड किल्यांची स्पर्धा आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देत असतात. आ. रोहित पवारांनी देखील पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'सृजन' या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय गड किल्ले स्पर्धेचे ( Chhatrapati Shivaji Maharaj ) आयोजन करणे हे स्तुत्य आहे. परंतु स्पर्धे आधीच त्यांचे पोस्टर वादात सापडले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या आधी महाराष्ट्रात पोस्टर युद्ध रंगून फटके फुटतात का असा प्रश्न उपस्थित होतो.