ग्रामपंचायत निकाल: ठाकरेंना दणका देत १७ पैकी ११ ग्रामपंचायतीवर शिंदेंचाच विजय!

    17-Oct-2022
Total Views |
shinde gat


भंडारा
: भंडारा जिल्ह्याच्या १७ ग्रामपंचायती करिता झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ११ ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थित आमदार भोंडेकर गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. निकालानंतर विजयी उमेदवारांनी आमदार भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांसह पोहोचले. यांनतर त्यांनी सर्व सरपंचांना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले.
भोजापुर आणि टेकेपार या दोन ग्रामपंचायतीवर सरपंच आणि संपूर्ण पॅनलचा विजय झाला आहे. विजयी झालेल्या सरपंच उमेदवारांमध्ये राजेदहेगाव - स्वाती रत्नदीप हुमणे, खराडी - आशा संजय हिवसे, पिपरी - देवदास ठवकर, संगम - शारदा मेश्राम, केसलवाडा - आशु वंजारी, खैरी - सलीता जयदेव गंथाडे, टेकेपार - प्रियंका दिनेश कुंभलकर, गोसीखुर्द - आशिष माटे, भोजापुर - सीमा जयेंद्र मेश्राम, खमाटा - रुपाली रणजित भेदे, इटगाव - कविता सोमनाथ चौधरी यांचा विजय झाला आहे.