"फु बाई फू" पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस !

13 Oct 2022 16:28:42

fu bai fu
 
झी मराठी वाहिनीवर तब्बल १४ भाग प्रदर्शित झालेला कार्यक्रम म्हणजे फु बाई फू. झी मराठी वाहिनी सतत आपल्या प्रेक्षकांच मनोरंजन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे करत आली आहे. आता ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झी मराठी पुन्हा एकदा फु बाई फू हा कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमामध्ये कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी अनेक कलाकार दिसणार आहेत.
 
त्याचसोबत काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमामार्फत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत या दोन कलाकारांकडे असणार आहे. सध्या नेटकऱ्यांकडूनही या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार असणार आहेत याचीच चर्चा होताना दिसत आहे.
३ नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९:३० वा. झी मराठीवर "फु बाई फू" हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
Powered By Sangraha 9.0