६३ बांग्लादेशी पीडित हिंदु कुटूंबांना युपीत घरांसाठी लँण्ड बँकेतून जागा

06 Jan 2022 20:07:48

Yogi




लखनऊ
: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aaditynath) यांनी गुरुवार दि. ६ जानेवारी २०२१ रोजी राजधानी लखनऊमध्ये नायब तहसीलदार आणि निवड झालेल्या प्राध्यापकांना नियुक्तीपत्र दिले आहे. उत्तर प्रदेश सरकारने माफियांच्या ताब्यातील ६४ हजार ३६६ हेक्टर जागा मुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातील काही जमीन बांग्लादेशातून आलेल्या हिंदूंना देण्याचा निर्णय योगींनी घेतला आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “पाकिस्तान आणि बांग्लादेशातून ज्या हिंदूंना काढण्यात आले. ते सर्वजण दशकांपासून मेरठमध्ये राहत आहेत. मात्र, त्यांना अद्याप हक्काच्या घरांपासून वंचित राहावे लागत होते. भारतात आजही ते आश्रीतांप्रमाणेच राहत होते. इतकी वर्षे झाल्यानंतरही इथल्या राज्य सरकारांच्या काळात त्यांना घरासाठी जमीनी मिळू शकल्या नव्हत्या."

"अशातच आम्ही एकूण ६३ बंगाली हिंदू कुटूंबांना प्रति कुटूंब दोन एकर जमिनीचा तुकडा देत आहोत. त्यात दोनशे स्वेअर फुटांचं घर तयार करण्यासाठी दिले जाणार आहे.", असेही योगी म्हणाले. मुख्यमंत्री आवास योजनेअंतर्गत एक-एक घर तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यासाठी योजनेतील पात्र प्रत्येक लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यांना मिळणाऱ्या जमिनी मोफत दिल्या जाणार आहेत.





Powered By Sangraha 9.0