डिसेंबर 2021 मध्ये ऐतिहासिक 37.29 अब्ज डॉलर्सची निर्यात

पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वामुळे निर्यातीतील विक्रम साध्य – पियूष गोयल

    दिनांक  04-Jan-2022 13:09:13
|
ex

एप्रिल-डिसेंबर 2021 या काळात भारताची व्यापारी निर्यात 299.74 अब्ज डॉलर्स
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : डिसेंबर 2021 मध्ये आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यांत, देशाची व्यापारी निर्यात 37.29 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. ही आजवरची देशाची सर्वाधिक मासिक निर्यात असून, डिसेंबर 2020 च्या तुलनेत, या निर्यातीत 37.0% ची वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंजद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे हे साध्य झाल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी सांगितले आहे.
 
 
एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत भारताची व्यापारी निर्यात 299.74 अब्ज डॉलर्स इतकी होती, एप्रिल-डिसेंबर 2020 या काळात हीच निर्यात, 201.37 अब्ज डॉलर्स इतकी होती, ज्यात 2021 मध्ये 48.85% पेक्षा अधिकची वाढ झाली. डिसेंबर 2021 महिन्यांत, भारताची व्यापारी निर्यात 59.27 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती. डिसेंबर 2020 42.93 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या तुलनेत यात 38.06% वाढ झाली आहे. एप्रिल - डिसेंबर 2021 या काळात भारताची व्यापारी आयात 443.71 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. एप्रिल - डिसेंबर 2020 च्या तुलनेत यात 69.27% इतकी वाढ झाली आहे. एप्रिल - डिसेंबर 2020 मध्ये ही 262.13 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. आणि एप्रिल - डिसेंबर 2019 च्या 364.18 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या आयातीच्या तुलनेत 21.84% वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये व्यापारी तुट 21.99 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, आणि एप्रिल - डिसेंबर 2021 दरम्यान ती 143.97 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती.
 
 
 
 
 
डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलीयम वस्तूंची निर्यात 31.67 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, यात डिसेंबर 2020 मध्ये असलेल्या 24.88 दशलक्ष डॉलर निर्यातीच्या तुलनेत 27.31% इतकी सकारात्मक वाढ झाली. डिसेंबर 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम पदार्थांची निर्यात 43.37 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, त्यात डिसेंबर 2020 मध्ये असलेल्या 33.31 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 30.22% वाढ झाली. एप्रिल - डिसेंबर 2021 दरम्यान भारताची बिगर पेट्रोलियम पदार्थांची एकूण निर्यात 257.14 दशलक्ष डॉलर इतकी होती. यात एप्रिल - डिसेंबर 2020 दरम्यान असलेल्या 183.91 अमेरिकन डॉलर निर्यातीच्या तुलनेत 39.82% वाढ नोंदवली गेली. एप्रिल - डिसेंबर 2021 दरम्यान भारताची बिगर पेट्रोलियम पदार्थांची एकूण आयात 325.73 दशलक्ष डॉलर इतकी होती. यात एप्रिल - डिसेंबर 2020 दरम्यान असलेल्या 208.25 अमेरिकन डॉलर आयातीच्या तुलनेत 56.41% वाढ नोंदवली गेली.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचे यश – पियूष गोयल
 
 
ही देशाची ऐतिहासिक कामगिरी आहे असून त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व आणि दूरदृष्टीस आहे, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे या यशासाठी त्यांनी ईपीसी, निर्यातदार आणि भारतीय दूतावासातील सर्व अधिकाऱ्यांचेही अभिनंदन केले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.