जनकल्याण समितीचा 'मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅन' उपक्रम

31 Jan 2022 15:02:53

RSSJS 3
 
मुंबई : परळ विभागातल्या रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर सहा वर्षांपर्यंतची मुले व त्यांच्या मातांच्या आरोग्य तपासणीसाठी 'मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅन'ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. माता बाल आरोग्य आहार प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला.
 
 
 
गिरगावमधली बाणगंगा वस्ती व कामाठीपुरा वस्ती, परळमधली सीतासदन वस्ती, श्री दत्त कृपा वस्ती, त्रिवेणी सदन क्र. १ आणि योगेश्वर सोसायटी तसेच दादरच्या सिद्धिविनायक परिसरातील ठाकूर वाडी आणि गीता नगर तर माटुंगा मधल्या वडाळा विजय नगर परिसरात कायम स्वरुपी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
 


RSSJS 2
 
 
'एकूण ९ ठिकाणी कायम स्वरुपी हा उपक्रम सुरू केला असून प्रत्येक महिन्यातून एक दिवस ही आरोग्य तपासणी व्हॅन वरील प्रत्येक वस्तीत आरोग्य तपासणी साठी जाणार आहे.', असे परळ विभाग कार्यवाह प्रताप परब यांनी सांगितले.
 
 
 
RSSJS 1
 
 
Powered By Sangraha 9.0