मुंबई : भारतीय क्रिकेट संघ जोहान्सबर्गमध्ये दुसरा कसोटी सामना खेळत आहे. यावेळी नेमके नाणेफेकीआधीच संघात एक मोठा बदल करण्यात आला. तो म्हणजे दुखापतीचे कारण देत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा संघाबाहेर राहिला. त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली. तर के. एल. राहुलला कर्णधार बनवण्यात आले. मात्र, सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टने तो चांगलाच चर्चेत आला. कारण अवघ्या काही तासांपूर्वीचा त्याने ट्विटरवर फलंदाजी करतानाचे फोटो टाकले होते.
कोहलीच्या पाठीत क्रॅम्प आल्यामुळे शेवटच्या क्षणी नाणेफेकपूर्वी सामन्यातून बाहेर पडावे लागले, असे सांगण्यात आले. मात्र, ३ तारखेला होणाऱ्या सामन्यापूर्वी २ तारखेला त्याने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तो नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. यावेळी त्याने 'वर्ष नवे, प्रेरणा तिच' असे लिहिले आहे. नेटकऱ्यांनी यावर 'या चित्रांमध्ये तर काही त्रास नसल्यचे वाटतंय. मग, आज पाठीचा त्रास झाल्याची बातमी कशी?' असे म्हंटले आहे. हे पाहून आता सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एकाने ट्विट केले आहे की, "विराट कोहली लहान मुलासारखे वागत आहे आणि बीसीसीआयने त्याला लाडात घ्यावे अशी त्याची इच्छा आहे. पण त्याला हे समजत नाही की त्यांना पहिले चांगली फलंदाजी करत धावा कराव्या लागतात. जस सध्या चित्र आहे यावरून असेच वाटते की, त्याला लवकरच कर्णधारपद सोडावे लागेल."
काही लोकांनी 'कोहलीला २४ तासांच्या आता पाठदुखी झाली कशी?' असा सवाल विचारत आहेत. तर एकाने राणा अयुबला पाठवलेल्या गिफ्टचे फोटो शेअर करून कोहलीला टार्गेट केले आहे. 'आपल्या देशाचा द्वेष करणाऱ्यांवर एवढे प्रेम का आहे? नक्की मनात चाललंय तरी काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.