केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला देशाच्या सुरक्षेचा आढावा

03 Jan 2022 20:30:10
hm

केंद्रीय यंत्रणांचे प्रमुख आणि राज्यांचे पोलिस महासंचालक उपस्थित
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे देशासमोरील संभाव्य धोके आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली.
 
 
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दहशतवाद आणि जागतिक दहशतवादी गट, दहशतवादी वित्तपुरवठा, अंमली पदार्थ आणि दहशतवाद, संघटित गुन्हेगारी-दहशतवाद, सायबर स्पेसचा बेकायदेशीर वापर, परदेशी दहशतवादी गटांच्या हालचाल इत्यादींच्या सततच्या धोक्यांवर प्रकाश टाकून केंद्रीय गृहमंत्र्यांनी अधिक चांगल्या समन्वयाच्या गरजेवर भर दिला. त्याचप्रमाणे सतत बदलणाऱ्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यावर विशेष भर दिला.
 
 
या बैठकीस सीएपीएफ, सशस्त्र दलांच्या गुप्तचर शाखा, महसूल आणि आर्थिक गुप्तचर संस्था या प्रमुख देशातील सुरक्षा संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. त्याचप्रमाणे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
 
 
 
  
Powered By Sangraha 9.0