माणगावमधला पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादी-शिवसेना आमनेसामने

29 Jan 2022 16:24:55

Sunil Tatkare
 
 
ठाणे : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सोयरीक रायगड जिल्ह्यात मात्र जुळत नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा नगर पंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आला आहे. माणगाव नगर पंचायतीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्याची गंभीर दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेतली. भविष्यात जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेसोबत दोन हात करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
'माणगावमधली एक नगर पंचायत मिळावी म्हणून शिवसेनेने याच भाजपची मदत घेतली. राजकारणातली इतकी लाजिरवाणी परिस्थिती मी पाहिली नाही.', अशा शब्दांत तटकरे यांनी सेनेला फटकारले. 'माणगाव नगर पंचायतीत झालेल्या पराभवाचा वचपा आता राष्ट्रवादी काढल्याशिवाय राहणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे', असे आवाहनही पुढे त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
 
 
Powered By Sangraha 9.0