‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ नामकरणास विहिंपचा विरोध

25 Jan 2022 14:56:49

Ground
 
 
 
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात आले आहेत. विश्व हिंदू परिषदेने यास तीव्र विरोध दर्शविला आहे. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास आले. याचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. २६ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत.
 
 
 
'टिपू सुलतान हिंदू विरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसेच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्याही केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निवेदन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत आहोत,' असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद, मुंबईचे सहमंत्री व प्रवक्ते श्रीराज नायर यांनी केले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0