काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आरपीएन सिंह यांचा भाजप प्रवेश !

25 Jan 2022 15:05:46

RPN SINGH.jpg

नवी दिल्ली :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आरपीएन सिंह यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर काही वेळातच ते दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोचले. येथे त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले.




तत्पूर्वी, त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, "माझ्यासाठी ही एक नवीन सुरुवात आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी आणि माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राष्ट्र उभारणीत माझे योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे."


मंगळवारी सकाळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात भाजप त्यांना पडरौना येथून तिकीट देऊ शकते, असे मानले जात आहे.




 
Powered By Sangraha 9.0