मुंबईच्या जीयाची जागतिक भरारी ; पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान

25 Jan 2022 17:52:46

Jia Rai
मुंबई : मुंबईच्या जिया राय हिची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. १३ वर्षीय जिया रायने अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमींग आणि ओपन वॉटर स्विमींगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला. प्रजासत्ताक दिनी 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहे.
 
 
जियाने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर साडे तीन तासात पोहून पार करत विक्रमाची नोंद केली. जियाला ऑटिझम आहे तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. जियाला बोलता येत नाही, ती स्वमग्न असते. जिया अपंग असताना ही तिने धडधाकट असलेल्या लोकांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी जीया हिने पोहण्यात विश्वविक्रम केला आहे. त्यामुळे मुलांमध्ये जे कमी आहे ते न पाहता , ते काय करू शकतात याकडे लक्ष द्यावे असे तिचे वडील सांगतात.
 
 
Powered By Sangraha 9.0