महाराष्ट्राच्या अविनाश भाईगडेची अष्टपैलू कामगिरी

25 Jan 2022 15:29:33

mumbai
 
 
मुंबई : मुंबईचा युवा खेळाडू अविनाश विजय भाईगडे याने दुसऱ्या राष्ट्रीय ऑलिम्पिक गेम्स फेडरेशन कप २०२२मध्ये अष्टपैलू कामगिरी करत भारतीय फुटबॉल संघामध्ये निवड करण्यात आली. त्याने या स्पर्धेत महाराष्ट्र फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण पदकाची कमाई करून दिली. माटुंग्यातील डॉन बॉस्को शाळेत शिकणाऱ्या अविनाशने संधीचे सोने करत त्याने फुटबॉलशिवाय कुस्तीमध्ये सुवर्ण तर कराटेमध्ये रौप्य पदक पटकावले आहे.
 
 
अविनाश भाईगडेची निवड नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल गेम्स २०२२मधील भारतीय संघात करण्यात आली आहे. तसेच, त्याने गोव्यात झालेल्या पहिल्या मिशन ऑलिम्पिक स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप २०२२मध्ये १२ वर्षांखालील स्केटिंग प्रकारात रौप्य पदकही पटकावले आहे. याशिवाय १४ वर्षांखालील प्रकारात शंभुराज सुहास घोडकेने रौप्य तर ६ वर्षांखालील प्रकारात साईराज सुहास घोडकेने कांस्य पदक पटकावले आहे.
 
 
साताऱ्यातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील गावकऱ्यांनी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी रेठरे बृदुकच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, उप सरपंच शिवाजी दमामे, तंटामुक्ती अध्यक्ष आबा मोहिते, प्रशिक्षक संजय घोडके आणि जिल्हा परिषद सदस्य शामबाला घोडके, तसेच समिती सदस्य दिलीप धर्मे,सरदार मोरे,विक्रम साळुंखे,नाथाजी साळुंखे,अधिक साळुंखे हेदेखील उपस्तीत होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0