नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून शिफारस – कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा धक्कादायक खुलासा

24 Jan 2022 17:45:54
capt

६५ – ३७ – १५ असा ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : नवज्योतसिंग सिद्धू हे ‘बिनकामाचे’ असल्याचे मी त्यांनी मंत्रिमंडळातून हाकलले होते. मात्र, सिद्धू यांना मंत्रिमंडळात घ्यावे; यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी माझ्याकडे शिफारस केल्याची धक्कादायक दावा पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोककाँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी केला.
 
 
bjp 
 
 
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, पंजाब लोककाँग्रेस आणि संयुक्त अकाली दल यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, पंजाब लोककाँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग आणि संयुक्त अकाली दलाचे सुऱखदेवसिंग ढिंढसा उपस्थित होते. पंजाबच्या १४० जागांपैकी भाजप सर्वाधिक ६५ जागांवर निवडणुक लढविणार आहे, त्याखालोखाल पंजाब लोककाँग्रेस ३७ तर संयुक्त अकाली दल १५ जागांवर निवडणूक लढविणार आहे.
 
 
पत्रकारपरिषदेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, नवज्योतसिंग सिद्धू अतिशय ‘बिनकामाचे’ असल्याने त्यांची माझ्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. त्यापूर्वी त्यांनी त्यांची कार्यशैली सुधारावी, अशी सुचना त्यांना वारंवार करण्यात आली होती. त्यांची हकालपट्टी केल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी माझ्याकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक संदेश पोहोचविण्यात आला. त्यामध्ये, नवज्योतसिंग सिद्धू हे आपले चांगले मित्र आहेत. त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करता आल्यास बघा. त्यांनी चांगले काम न केल्यास त्यांना काढून टाका; अशी शिफारस करण्यात आली होती. भारतातील एका राज्यातील व्यक्तीसाठी पाकचा पंतप्रधान शिफारस करतो, हे माझ्यासाठी अतिशय धक्कादायक असल्याचेही कॅप्टन अमरिंदर सिंग यावेळी म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0