मुंबईकर गारठले! सोशल मीडियावर मीम्सचाही तडाखा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2022
Total Views |

Mumbai
मुंबई : राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान १६ अंशांवर पोहोचले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
 
 
 
 
मुंबईच्या हवेत धूलिकण पसरल्याने मुंबईतील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. पाकिस्तान येथील धुळीचे वादळ गुजरात मार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतल्या अनेक भागातील हवेचा दर्जा अत्यंत खालावला आहे. धूलिकणांच्या धुरक्याला मुंबईकरांना आणखी दोन दिवस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईत थंडी कायम राहणार असून तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
 
 
 
मुंबई पडलेल्या थंडीनंतर सोशल मिडीयावरदेखील मिम्सचा चांगलाच तडाखा पाहायला मिळाला. अनेकांनी तर आता मुंबईत बर्फ पडतो कि काय? अशा अस्शायाच्या भावना व्यक्त केल्या.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@