मतदानाच्या अधिकाराबाबत करण जोहरने 'कू' वर केली जागृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2022
Total Views |
Karan Johar
 
 
 
मुंबई : 'राष्ट्रीय मतदार दिवसा'च्या आधी प्रख्यात सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सामान्य नागरिकांमध्ये मतदान अधिकारांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खास पाऊल उचलले आहे. भारताचा एकमेव बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू अॅप' वर करणने एक पोस्ट लिहिली आहे. भारतात २५ जानेवारी हा 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो.
 
 
 
'भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि मतदान हा हरेक मतदाराचा अधिकार आहे. २५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदाता दिवस' आहे आणि यानिमित्त मला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे, की मत देण्याचा आपला अधिकार वापरण्यास विसरू नका.' अशी पोस्ट करणने आपल्या सोशल मीडियाच्या कू अँप या प्लॅटफॉर्म केली आहे.
 
 
 
करण जोहर अनेक सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर वेळोवेळी निर्भिडपणे व्यक्त होत असतो. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरसह पाच राज्यांमध्ये येत्या १० फेब्रुवारीपासून ७ मार्चच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल १० मार्चला घोषित केले जातील.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@