अंटार्क्टिका खंडात भारतीय कन्येचा अनोखा विक्रम!

24 Jan 2022 18:18:33

PolarPreet
 
  
 
नवी दिल्ली : ब्रिटीश शीख आर्मी अधिकारी आणि फिजिओथेरपिस्ट असणाऱ्या भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रीत चंडी यांनी अंटार्क्टिका खंडाची सोलो ट्रेक पूर्ण करून नवा इतिहास रचला आहे. वयाच्या ३२व्या वर्षी अवघ्या ४० दिवसांत त्यांनी हा अनोखा विक्रम केला आहे.
 
 
 
कॅप्टन चंडी या एकट्याने ही ट्रेक पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला आणि या मोहिमेतल्या तिसऱ्या सर्वात वेगवान महिला आहेत. त्यामुळे यांना पोलार प्रीत म्हणूनही ओळखले जाते. कॅप्टन चंडी यांचा शेवटच्या दिवसाचा स्लेज ओढतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. -५० अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी ६०मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याशी झुंज देत ११०० किलोमीटरहून अधिक प्रवास केल्यानंतर त्यांचा इतिहास घडवणारा हा पराक्रम घोषित करण्यात आला.
 
 
 
'मी सध्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे माझ्या मनात सध्या अनेक विचार सुरू आहेत. मला तीन वर्षांपूर्वी ध्रुवीय जगाबद्दल काहीच माहित नव्हते. माझ्यासाठी इथवर पोहोचणे खूप कठीण होते. यासाठी लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवण्यास त्यांना प्रोत्साहित करण्याची माजी इच्छा आहे.', असे मत कॅप्टन हरप्रीत चंडी यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0