ताडदेव अग्नितांडव प्रकरण : पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2022
Total Views |

PMNRF
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत मृतांच्या कुटुबियांचे सांत्वन केले असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. या आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये मदत तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यास पंतप्रधानांनी मंजुरी दिली आहे.
 
 
 
पिएमओने केले ट्विट!
'मुंबईत ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीचे वृत्त ऐकून आम्हास दुःख झाले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांकडे आम्ही शोकभावना व्यक्त करतो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. आगीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत देण्यात येतील.', असे ट्विट पिएमओकडून करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@