नेटफ्लिक्स CEO? केबल ऑपरेटरवर खार का खातायतं?

23 Jan 2022 17:39:27

net




वेब डेस्क :
व्हीडिओ कंटेंट निर्मात्या नेटफ्लिक्सनं भारतातील व्यावसायवृद्धीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कंपनीने याचे खापर टिव्ही केबल ऑपरेटर्सवर फोडले आहे. हिंदूविरोधी आशयनिर्मितीमुळे टीकेचा सामना कराव्या लागलेल्या नेटफ्लिक्सला आता आपले सबस्क्रायबर्स वाढविण्यासाठी किंमतीत घट करावी लागली. तरीही फायदा झालेला दिसत नाही. कंपनी प्रादेशिक आशयनिर्मितीसाठी कंपनी आता कोट्यवधी खर्च करताना दिसत आहे.



कंपनीच्या महसुल आकडेवारीबद्दल सीईओ रिड हॅस्टिंग्स यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "चांगली गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्या स्पर्धकांबद्दल चांगल्या स्थितीत आहोत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे भारतात म्हणण्याप्रमाणे अपेक्षित यश आलेले नाही. भारतातील बाजारपेठ काबीज करता यावी यासाठी रणनिती आखण्यात आली. सबस्क्रीप्शन किंमतीत घट करण्यात आली मात्र, त्याचा फायदा झाला नाही. भारतात टीव्ही केबल नेटवर्क प्रचंड मोठे आहे. हे या देशाचे वैशिष्ट्य आहे."


"केबल टिव्हीसाठी प्रतिमहिना दोनशे ते तीनशे रुपये इतका खर्च येतो. जगाचा विचार केल्यास सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे घराघरात पोहोचणे आपल्यासाठी कठीण होऊन बसले आहे.", असेही ते म्हणाले. कंपनीचे COO (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) ग्रेग पीटर्स म्हणाले की, भारतात आम्ही भागीदारीवर जोर देणार आहोत. ज्यामुळे आम्हाला इथल्या प्रेक्षकांना रुचेल अशी आशयनिर्मिती करत आहोत. सबस्क्रीप्शनच्या किंमती कमी करण्याची हीच वेळ आहे. ज्यामुळे अधिकाधिक सबस्क्राईबर्स आमच्यापर्यंत पोहोचतील."


ते म्हणाले, “आम्हाला भारतीयांची पसंती समजण्यासाठी जरा वेळ लागेल. मात्र, भविष्यात आम्हाला काही सकारात्मकता दिसत आहे." हिंदू धर्माविरोधी आशयनिर्मितीमुळे प्रचंड विरोध झाला होता. कंपनीने भारतात दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली होती. २०१६मध्ये भारतात लॉन्च करण्यात नेटफ्लिक्सने प्रादेशिक आशयनिर्मितीकडे दुर्लक्ष केल्याने कंपनीचे शेअर्स २२ टक्क्यांनी घसरल्याचे ते म्हणाले.



भारतीय संस्कृती विरोधात आशयनिर्मिती केल्याने नेटफ्लिक्सला भारतीयांनी मननोकळेपणे स्वीकारले नाही. भारतरत्न, दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मान आणि ऑस्करने सन्मानित झालेल्या दिवंगत चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या कथांवर आधारित ‘Ray’ ही वेबसिरीज दाखविण्यात आली. त्यातील ‘Spotlight’ या एपिसोडमध्ये एका हिंदू साध्वीच्या मूळ कहाणीत बदल करून दाखविण्यात आली. मुलांबद्दल आपत्तीजनक आशय निर्माण केल्याबद्दल बॉम्बे बेगम सिरीज विरोधात महाराष्ट्र पोलीसांत तक्रारही दाखल झाली होती.



मंदिराच्या प्रांगणात आरती सुरू असताना अश्लील दृश्य दाखविण्यासाठी ‘A Suitable Boy’ नावाची वेबसिरीजही वादग्रस्त ठरली. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीची सेक्रेड गेम्स, हुमा कुरेशीची ‘लैला’, राधिका आपटे ‘घौल’ आणि स्टॅण्ड अप कॉमेडियन हसन मिन्हाजची ‘पेट्रीयट एक्ट’वरही हिंदुघृणा दाखविल्याचा आरोप झाला.




Powered By Sangraha 9.0