"चन्नी, सिद्धू, भगवंत मान हे पंजाबसाठी निरुपयोगी"

22 Jan 2022 15:42:57

Punjab
नवी दिल्ली : पंजाबच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत. अशामध्ये आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार घोषित केलेले नेते भागवत मान, कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, आगामी निवडणुकांमध्ये पंजाबची जनताच कॉंग्रेसला अद्दल घडवेल, असे मत व्यक्त केले आहे.
 
 
 
एका मुलाखतीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हंटले की, "आपच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार भगवंत मान हा विनोदी अभिनेता आहे. पंजाबच्या जनतेला कॉमेडी नाही तर गंभीरता हवी आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याकडे पंजाबसाठी कोणतेही मॉडेल नाही. ते फक्त हवेतच बाता मारत आहेत." असे म्हंटले आहे. तर दुसरीकडे, " चरणजीत सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू हे दोघेही पंजाबसाठी निरुपयोगी आहेत. काँग्रेसमधील लढाई त्यांना निवडणुकीत धडा शिकवेल." असे म्हणत टीका केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0