दिल्लीहून दिव्य काशी यात्रेसाठी विशेष ट्रेन; नरेंद्र मोदींची घोषणा

21 Jan 2022 17:55:07
narendra modi



अहमदाबाद -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोमनाथमधील नवीन सर्किट हाऊसचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. सोमनाथ मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या सर्टिक हाऊसच्या बांधकामासाठी ३० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रत्येक खोलीतून समुद्राचे दृश्य दिसते अशा पद्धतीने ते बांधण्यात आले आहे.

उद्घाटनानंतर आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, “भगवान सोमनाथाच्या पूजेमध्ये आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे - भक्तिप्रदाय कृतावतारम् तन सोमनाथम शरणम् प्रपद्ये. म्हणजेच भगवान सोमनाथाच्या कृपेने अवतरणातून कृपेचे साठे खुले होतात. ज्या परिस्थितीत सोमनाथ मंदिराचा विध्वंस झाला आणि त्यानंतर ज्या परिस्थितीत सरदार पटेलांच्या प्रयत्नातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला, या दोन्ही कृती आपल्यासाठी खूप मोठा संदेश आहे. ते म्हणाले, “सुमारे १० दशलक्ष भाविक दरवर्षी विविध राज्ये, देश आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून सोमनाथ मंदिराला भेट देतात. जेव्हा हे भक्त इथून परत जातात, तेव्हा ते अनेक नवीन अनुभव, अनेक नवीन कल्पना आणि नवीन विचार घेऊन जातात. सोमनाथ टेम्पल ट्रस्टने कोरोनाच्या काळात ज्या प्रकारे प्रवाशांची काळजी घेतली, समाजाची जबाबदारी घेतली, त्यात ‘जीव ही शिव’ ही कल्पना दिसते, असे पंतप्रधान म्हणाले.

वाराणसीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, रामायण सर्किटच्या माध्यमातून भक्त भगवान श्री रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देऊ शकतात. त्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय २२ जानेवारीपासून दिल्लीहून दिव्य काशी यात्रेसाठी विशेष ट्रेन सुरू होणार आहे. ते म्हणाले की, आजच्या काळात पर्यटन वाढवण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. पहिली स्वच्छता- पूर्वी आपली पर्यटनस्थळे, पवित्र तीर्थक्षेत्रेही अस्वच्छ होती. आज स्वच्छ भारत अभियानाने हे चित्र बदलले आहे. पर्यटनाला चालना देणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सोयी-सुवधा. पण त्याची व्याप्ती केवळ पर्यटन स्थळांपुरती मर्यादित नसावी. तिसरी गोष्ट म्हणजे जागा. पर्यटन वाढवण्यासाठी चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली विचारसरणी. विचार हे नाविन्यपूर्ण आणि आधुनिक असणे आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला आपल्या प्राचीन वारशाचा किती अभिमान आहे, हे खूप महत्त्वाचे आहे.
Powered By Sangraha 9.0