‘निवडक कुटुंबांसाठीच’ वास्तू उभारणीचा संकुचित विचार कालबाह्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2022
Total Views |
PMO


सोमनाथाचा जिर्णोद्धार हा सरदार पटेल यांनी दिलेला मोठा संदेश
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : स्वातंत्र्यानंतर देशात दिल्लीत काही निवडक कुटुंबांसाठीच नव्या वास्तू उभारण्यात आल्या. मात्र, आज देशाने त्या संकुचित विचारणीचा त्याग केला असून अभिमानाच्या अशा नव्या वास्तूंची भव्य उभारणी केली जात आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
 
 
गुजरातमधील सोमनाथ येथील नव्या सर्किट हाऊसचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यमंत्री, संसद सदस्य, मंदिर न्यासाचे सदस्य उपस्थित होते.
 
 
स्वातंत्र्यानंतर केवळ निवडक कुटुंबांसाठीच नव्या वास्तू उभारण्याचे प्रकार घडले. मात्र, आज देश त्या संकुचित विचारसरणीला मागे टाकून अभिमानाची नवी ठिकाणे बांधून त्यांना भव्यता देत आहे. विद्यमान केंद्र सरकारने दिल्लीत बाबासाहेबांचे स्मारक, रामेश्वरममध्ये एपीजे अब्दुल कलाम स्मारक उभारले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी संबंधित स्थानांना योग्य दर्जा देण्यात आला आहे. आपल्या आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास समोर आणण्यासाठी देशभरात आदिवासी संग्रहालये देखील बांधली जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
 
 
 
 
 
पंतप्रधानांनी सोमनाथ सर्किट हाऊसच्या उभारणीविषयी गुजरात सरकार, सोमनाथ मंदिर न्यास आणि भाविकांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, एकेकाळी विध्वंस झालेल्या मंदिराची भव्य उभारणी ही देशाला अभिमानास्पद अशी आहे. सोमनाथ मंदिर ज्या परिस्थितीत नष्ट झाले आणि ज्या परिस्थितीत मंदिराचा जीर्णोद्धार सरदार पटेल यांच्या प्रयत्नांनी झाला, ते दोन्ही एक मोठा संदेश देतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सोमनाथसारखी संस्कृती आणि श्रद्धेची ठिकाणे देशाच्या केंद्रस्थानी आहेत, असेही पंतप्रधधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@