प्रियांकांचा राहुल गांधी यांना 'ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2022
Total Views |
gandhi

'गंभीर राजकारणी' अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रियांकांचा प्रयत्न
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : उत्तर प्रदेशात आपणही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहोत, असा दावा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांनी शुक्रवारी केला. प्रियांका यांच्या या दाव्यामुळे, त्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत आहेत का; अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
उत्तर प्रदेशात काँग्रेसचा नेतृत्वाचा चेहरा कोण, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा काँग्रेस करणार का; या प्रश्नांची उत्तरे वाड्रा यांनी दिली. त्यावर त्यांनी “माझ्याशिवाय आणखी कोणी चेहरा दिसत आहे का ?”, असा प्रतिप्रश्न केला. काँग्रेसला उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाएवढे यश मिळण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे. मात्र, प्रियांकांच्या या दाव्याकडे ‘पक्षाचे मनोबल उंचावण्यासाठी केलेले वक्तव्य’ असे न पाहता; पक्षातील अर्थात गांधी कुटुंबातील नेतृत्वसंघर्षाच्या नजरेतून पाहण्याची गरज आहे.
 
 
काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांच्यावर सोपविली आहे. गेल्या दिड वर्षांपासून त्या उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी काम करीत आहेत. त्या उत्तर प्रदेशात पक्षाला यश मिळावे, यासाठी धडपड करीत असताना राहुल गांधी मात्र परदेशात आपल्या वैयक्तिक कारणासाठी सुटीवर गेले होते.
 
त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना आता प्रियांका गांधी – वाड्रा यांच्याविषयी विश्वास निर्माण झाल्याचे काँग्रेसच्या गोटात दबक्या आवाजात बोलण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जर दोन आकडी संख्या गाठणे काँग्रेसला शक्य झाले, तर त्याचे संपूर्ण श्रेय प्रियांकांना देण्यात येईल. पुढे त्या जोरावर काँग्रेस अध्यक्षपदावरही दावा सांगण्याचा प्रयत्न प्रियांका यांच्या गटाकडून होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@