बांग्लादेश - पूजेकरिता तयार केलेल्या देवी सरस्वतीच्या ३५ मूर्तींची नासधूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2022
Total Views |
bangladesh



बांग्लादेश - गेल्या वर्षी दुर्गापूजेच्या वेळी संपूर्ण बांग्लादेशात घडलेल्या हिंदुद्वेषाच्या आघातातून हिंदू अद्याप बाहेर येऊ शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत आता सरस्वती पूजेपूर्वी एका रात्रीत ३५ सरस्वती मूर्ती नष्ट झाल्याच्या घटनेने हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चितगावच्या बंदर शहरातून सरस्वतीच्या मूर्तींची नासधूस केल्याची घटना नोंदवण्यात आली आहे. जिथे आगामी पूजेसाठी तयार करण्यात आलेल्या सरस्वतीच्या मातीच्या मूर्तींची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली. १४ जानेवारी, शुक्रवार रोजी बोअखली येथे किमान ३५ सरस्वती मूर्तींचा नासधूस करण्यात आल्याचे वृत्त बंगाली दैनिक संवाद प्रतिदिनने प्रकाशित केले आहे. उपजिल्हा पूर्व शाकपुरा येथील सुप्रसिद्ध लाला हाट आश्रयण प्रकल्पाजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.


या मूर्ती बासुदेव पाल यांनी विक्रीसाठी तयार केल्या होत्या. बासुदेव यांचा पूर्वजांचा व्यवसाय असून त्यांच्या पूर्वजांनीही हिंदू देवतांच्या मूर्ती साकारल्या आहेत आणि त्यांनी सुमारे शंभर वर्षे त्यांची परंपरा जपली आहे. त्यामुळे गरीब कलाकाराच्या मुर्तीवर असा हल्ला झाल्याने स्थानिक स्तब्ध झाले आहेत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील संतप्त नागरिकांकडून होत आहे. बासुदेव पाल सांगतात की, ते लाला हाट येथे दरवर्षी मुर्ती बनवत आहेत. यंदा ५ फेब्रुवारीला होणाऱ्या सरस्वती पूजेच्या निमित्ताने मूर्ती तयार केल्या जात होत्या. मूूर्तींच्या सुरक्षेसाठी त्याला बांबूच्या कुंपण करुन त्याभोवती पांढरे पडदे लावले होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांना ३५ सरस्वती मूर्तींची नासधूस झाल्याचे दिसले. त्यापैकी बहुतेक मूर्ती ग्राहकांनी आॅर्डर करुन तयार करण्यास सांगितल्या होत्या. त्यासाठी आगाऊ पैसे दिले होते. अशी घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याची खंत मूर्तीकाराने व्यक्त केली.




स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अब्दुल करीम यांनी मूर्तींची विटंबना झाल्याची बाब फेटाळून लावली आहे. ते म्हणाले “ मूर्ती कोणीतरी मुद्दाम मुर्ती फोडल्या आहेत असे वाटत नाही. निवारा प्रकल्पात राहणारी लहान मुले खेळताना किंवा गाड्या ढकलताना किंवा मिनी ट्रकने बांबूची वाहतूक करताना चुकून मुर्तींवर आदळल्याची शक्यता आहे. असो, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.” पोलिसांचे हे विधान आश्चर्यकारक नाही. कारण, बांग्लादेशच्या प्रशासनातील दिग्गजांनीही यापूर्वी हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना रद्द केल्या होत्या. कोमिल्ला येथील दुर्गा मंडपामध्ये इकबाल हुसेन या मुस्लिम व्यक्तीने कुराणाची प्रत ठेवल्यानंतर शेकडो पूजा मंडप आणि हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली होती.


@@AUTHORINFO_V1@@